| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.१४ एप्रिल २०२४ -
राहुल गांधी यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीतील भाषणात शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, आज भाजपाने आपल्थ् संकल्प पत्राद्वारे उत्तर दिले आहे. मोदी यांनी यावेळी शेतकऱ्यांसाठी भाजप पक्ष कुठल्या हमी देणार आहे याबाबतही सांगितले आहे.
नैसर्गिक शेतीवर भर दिला जाईल
मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी नैसर्गिक शेतीवर भर दिला जाईल. भारताने क्रांतिकारी कार्य सुरू केले असून त्यात यशही मिळाले आहे. नॅनो युरियावर भर दिला जाणार आहे. शेतकरी समृद्धी केंद्रे विकसित केली जातील. फूड प्रोसेसिंग हब तयार करण्याचा संकल्प आहे. लाभ होतील आणि रोजगार निर्माण होईल. हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नवीन इंजिन बनतील.
किसान सन्मान निधी लाभ सुरूच राहील
भाजपनेच पशुपालक आणि मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डच्या कक्षेत समाविष्ट केले आहे. भविष्यातही देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळेल.