सांगली समाचार - दि. ८ एप्रिल २०२४
मुस्लिम समाज कायमच राष्ट्रीय प्रवाहात राहून बंधुभाव वृध्दीगंत करणारा आहे.पवित्र रमजान महिन्यात अत्यंत खडतर उपवास करुन समाज बांधवांना मदत करण्याचा मानवतावादी संदेश देणाऱ्या या महिन्यात कुराण पठण, नमाज, उपवास करुन जीवनात चांगले कसे वागावे याची शिकवण समाजात दिली जाते. अशा समाजाच्या पाठिशी स्व. वसंतदादा, स्व. गुलाबराव पाटील,स्व. पतंगराव कदम, स्व. मदनभाऊ हे खंबीरपणे उभे राहिले.. तोच वारसा आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढे नेऊ... तीन आठवडे आम्ही महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार येथे जाहीर करावा यासाठी प्रयत्नशील आहोत. पवित्र रमजान मध्ये काँग्रेस पक्षाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करत आहोत. मुस्लिम बांधवानी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्हाला यापूर्वी प्रमाणेच भक्कम साथ द्यावी संकटकाळी आम्ही मुस्लिम समाजाच्या मागे ताकदीने राहतोच.. यापुढेही भक्कम साथ देत राहू.. सांगलीकरांच्या हितासाठी एकजुटीने काम करत राहू असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. पृथ्वीराज पाटील फौंडेशन आयोजित बदाम चौकातील इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधवाशी गप्पा मारताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, ' लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाविकास आघाडीकडून सांगलीची उमेदवारी मिळावी म्हणून माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली मी व पृथ्वीराज पाटील व्यस्त आहे. एवढ्या व्यस्त काळात पृथ्वीराज बाबांनी इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आपल्या भेटीचा योग आणला आहे. आपण कायमच काँग्रेस पक्ष व आमच्या पाठिशी असता म्हणून आम्ही निश्चिंत आहोत असे सांगून शुभेच्छा दिल्या.
स्वागत करीम मेस्त्री यांनी केले. अय्याज नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. आभार बिपीन कदम यांनी मानले. यावेळी
सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष ( शरदचंद्र पवार) संजय बजाज, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमादार, असिफ बावा, अय्याज नायकवडी,करीम मेस्त्री, ए डी पाटील, बाळासाहेब पाटील, एन.एम. हुल्याळकर, कयुम पटवेगार, मैन्नुदीन बागवान, मंगेश चव्हाण, तोफिक शिकलगार, बिपीन कदम, युसूफ जमादार, अजीज मेस्त्री, उत्तम साखळकर, मयूर पाटील, लालू मेस्त्री, फिरोज पठाण, किरण जगदाळे, सनी धोतरे, अमित पाटील, विशाल चौगुले, ताजुद्दिन शेख, सागर घोडके, उमर गवंडी, सूहेल बलबंड, अख्तर अत्तार, हरिदास पाटील, विशाल चौगुले, याकूब मनेर, आयुब निशाणदार, विजय पाटील, प्रशांत अहिवळे, भाऊसाहेब पवार, आशिष चौधरी, समीर मुजावर, अल्ताफ पेंढारी, नामदेव चव्हाण, इरफान मुल्ला, मंदार काटकर, वसीम इनामदार, महावीर पाटील, प्रशांत देशमुख, विक्रम कदम, युवराज पाटील, शेखर पाटील, जयदीप पाटील, मनोज लांडगे, मुस्लिम बांधव व पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.