| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२५ एप्रिल २०२४
सांगली येथे पत्रकार बैठकीला संबोधित करताना संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मैदान सोडून पळ काढू नकोस असे आव्हान मी विशाल पाटील यांना आधीच दिले आहे. विशाल आता पुन्हा मैदानात आलेला आहे. आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे, पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल.
विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे या चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर केलेल्या आरोपावर मात्र संजयकाकांनी सावधपणे भूमिका मांडली. चंद्रहार बोललेत म्हणजे त्यांना संजय राऊत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून काही मेसेज आले असतील. विशालने काय भानगडी केल्या, काय नाही याबाबत दोन चार दिवसांमध्ये हळूहळू हेच पैलवान आपणाला बऱ्याचशा गोष्टी सांगतील असेही संजयकाका यांनी नमूद केले.
आता सर्वसामान्य मतदारांना प्रश्न पडला आहे की. पै. चंद्रहार पाटील की विशाल पाटील यांच्यापैकी भाजपची 'बी' टीम कोण ? आणि पै. चंद्रहार पाटील यांनी पुढील निवडणूक प्रचारादरम्यान विशाल पाटील यांच्या काही भानगडी कथित केल्या, तर त्यांना या सांगितल्या कोणी ? आणि नेमक्या खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितल्यानंतरच पै. चंद्रहार पाटील यांनी त्या जाहीर कशा केल्या ? असा प्रश्न निर्माण होणार आहे.