सांगली समाचार - दि. १२ एप्रिल २०२४
मुंबई - काय झाडी, काय डोंगार, एकदम सगळं कसं ओके... हे वाक्य अतिशय गाजलं होतं. शिंदे गटाच्या आमदारांना गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर तेथील वर्णन करताना शिंदे गटाचे आमदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फोनवर वर्णन करताना एक वाक्य बोलला होत...
काय झाडी, काय डोंगार, एकदम सगळे कसे ओके...
जे अतिशय व्हायरल झालं आणि खऱ्या अर्थाने गुलाबराव पाटील 'फेमस' झाले. आताही हेच वाक्य पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे पण या वेळेला ते भाजप नेते आशिष शेलार यांच्या एका ट्विटमुळे...
काय आहे प्रकरण ?
लोकसभा निवडणुकांना सुरुवात होताच भाजपा नेते अनंतकुमार हेगडे यांनी "४०० पार बहुमत आले की, संविधान बदलणार" असे जाहीरपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागाराने संविधान बदलले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला शोभत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र नाना पटोले यांच्या टिकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.
"काय झाडी, काय डोंगार, एकदम सगळं कसं ओके; काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके !"
असं म्हणत आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"काय झाडी..! काय डोंगार महायुतीमध्ये एकदम ओके.. आघाडीत एकमेकांना एकमेकांचेच धोके...
वर्षानुवर्षे काँग्रेसला काँग्रेसनेच हरवलं, त्यातच आता उबाठा गटाला घ्यायचं ठरवलं. या गटाच्या मैत्रीला तर दुष्मनाची ही नाही येणार सर...
ऐक काँग्रेस, आता तू कर्माने मर!" "साहेबांच्या गटाची तर काय सांगावी ख्याती ? गावभर भांडणं लागली की, साहेब म्हणणार आपली ताई आणि आपली बारामती...
काय झाडी, काय डोंगार, एकदम सगळे कसे ओके; काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके...
असे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले असून सध्या सर्वत्र याच पोस्टची चर्चा रंगलेली दिसते आहे.