yuva MAharashtra दोन गायींचे शेण, शेतकऱ्यांची वर्षाकाठी सव्वातीन लाख रू. कमाई

दोन गायींचे शेण, शेतकऱ्यांची वर्षाकाठी सव्वातीन लाख रू. कमाई


सांगली समाचार - दि.  १ एप्रिल २०२४

पुणे - आपण अनेक शेतकऱ्यांच्या दारात गोबरगॅस किंवा बायोगॅसची टाकी पाहिली असेल. खरंतर गोबरगॅस हा शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचा ठरतो आणि त्याचा शेतीलासुद्धा चांगला फायदा होत असतो. यापासून घरगुती वापरासाठी गॅस आणि शेतीसाठी स्लरी मिळत असल्यामुळे दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होतो. एका बायोगॅसपासून शेतकऱ्यांना वर्षाकाठी जवळपास तीन ते सव्वातीन लाख रूपयांचा नफा होऊ शकतो.


दरम्यान, दोन क्युबीक मीटरच्या बायोगॅसमध्ये दररोज सुमारे २० किलो देशी गायीचे शेणखत आणि २० लीटर पाणी टाकल्याने त्यापासून दररोज १० ते १२ व्यक्तींच्या स्वयंपाकाएवढा गॅस तयार होतो. एका महिन्याला दोन सिलेंडरएवढा गॅस तयार होतो. हा गॅस आपण एका बॅगमध्ये साठवून ठेवू शकतो आणि आपल्याला हवा तसा वापरू शकतो. यामुळे आपले महिन्याकाठी किमान २ हजार रूपये आणि वर्षाकाठी २० ते २४ हजार रूपयांची बचत होते. त्याचबरोबर बायोगॅसमध्ये जे शेण पावरले जाते त्या शेणापासून स्लरी तयार होते. तर पाच एकरला पुरेल एवढी स्लरी यातून तयार होते. ही स्लरी शेतीसाठी उपयुक्त असून त्यापासून आपण जीवामृतसुद्धा तयार करू शकतो. त्याचबरोबर यामुळे शेतीला दरवर्षी लागणारा अडीच ते तीन लाख रूपयांचा खतांचा खर्च वाचवू शकतो. खर्चासोबत स्लरीच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता आणि मातीतील जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते. जर शेतकऱ्यांकडे बायोगॅस आणि देशी गाई असतील तर त्या शेतकऱ्यांचे स्लरी आणि गॅसच्या माध्यमातून एका वर्षाकाठी जवळपास ३ ते सव्वातीन लाख रूपयांची बचत होते. खर्चामध्ये बचत करणे हीसुद्धा एक प्रकारची कमाईच आहे.