| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.१९ एप्रिल २०२४
सध्या देशात निवडणुकीच्या धामधुमीत सर्व व्यस्त आहेत. सर्वत्र निवडणुकीचा जोर दिसून येत आहे. कोण कुणाच्या विरोधात उभा आहे ? कोणाला जड जाणार ? कोण कोणाचा पराभव करणार ? पाच वर्षात कुणी किती काम केले ? हे आणि अशाच प्रकारचे प्रश्न सर्वत्र विचारताना दिसत आहेत. त्याचबरोबर चर्चा आहे ती वाढत्या उन्हाची. 40/45 अंश तापमान सर्वांनाच भाजून काढत आहे.
अशा परिस्थितीत देशातील सर्वच उमेदवारांसमोर विरोधक इतर कोणी नव्हे तर चक्क 'सुरज चाचू' असल्याचे दिसून येत आहे. आणि म्हणूनच प्रत्येक पक्षातर्फे कार्यकर्त्यांना व मतदारांना सूचना करण्यात येत आहेत, "बाहेर पडताना काळजी घ्या !" महाराष्ट्रात सर्वत्र पाच टप्प्यात मतदान होत असून त्याचा पहिला टप्पा आज आहे. सर्वच मतदारसंघात, मतदान केंद्रावर सकाळी बारापर्यंत मोठे गर्दी दिसून येत होती. 12 नंतर मतदाराने मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. आता संध्याकाळी चार नंतर मतदानाची वेळ संपेपर्यंत किती टक्के मतदान होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वाढत्या उन्हाचा फटका सर्वच उमेदवारांना बसणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. आणि म्हणूनच सर्वांच्या चर्चेत एकच विषय आहे ? 'सध्या किती उन्हाळा आहे ?' हाच प्रश्न इतर सर्व प्रश्नांना भारी पडत आहे. आता याचा किती प्रमाणात फटका बसला, याचे उत्तर निवडणूक निकालानंतरच दिसून येईल. तोपर्यंत आपण सर्वांनीच काळजी घेऊया