| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि.१४ एप्रिल २०२४ -
सांगलीत सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वाधिक आघाडी घेतली आहे ती विद्यमान खासदार संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी. कार्यकर्त्यांनी एक नवीनच टॅगलाईन निर्देशित केली असून, त्यानुसार "घराघरात मोदीजी, संजय काका आणि भाजपा" असा संकल्प सोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेले काम, भाजपचे धोरण तसेच खा. संजय काका पाटील यांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघात केलेले काम तसेच जिल्ह्याच्या विकासात त्यांचा संकल्प याची माहिती भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना देत आहेत.
प्रचारासाठी सभा, कोपरा सभा, बैठका यांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु त्यापेक्षा थेट मतदारांशी संपर्क साधून, सुसंवाद करण्याचे काम कार्यकर्ते स्वतःहून करीत आहेत. यामध्ये नवमतदारांचा टक्का वाढवण्यासाठीसुद्धा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असून, सांगली लोकसभा मतदार संघातील प्रत्येक महाविद्यालयातील नवंमतदारांशी त्यांचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदींनी "तरुणांच्या हाताला काम आणि योग्य दाम आणि उद्योग देण्यात सक्षमीकरण" हा संदेश पोहोचवण्यात येत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, सूर्य भाजून काढत आहे. त्यामुळे मतदारांनी सात मे रोजी सकाळी लवकरच लवकर मतदान करून घ्यावे, असेही कार्यकर्ते मतदारांना सांगत आहेत. हे कार्यकर्ते स्वखर्चाने स्वतःचे वाहन घेऊन स्वतःची शिदोरी आणि पाणी बरोबर घेऊन संजय काकांच्या प्रचारासाठी लोकसभा मतदारसंघातील गाव आणि गाव, घर आणि घर पिंजून काढताना दिसत आहेत. 'मतदान करा भाजपाला निवडून द्या संजय काकांच्या विजयाची हॅट्रिक करा !, असे कार्यकर्ते मतदारांना सांगत आहेत. मोदींनी, संजय काकांनी केलेल्या कामाची माहितीपत्रकाद्वारे मतदारांना देण्यात येत आहे. देशात स्थिर समर्थ आणि विकासाला गती देणारे मोदी कसे आवश्यक आहेत, याबाबत मतदारांना पटवून देण्यात कार्यकर्ते यशस्वी होत आहेत.
संजय काका गेल्या दहा वर्षात विकास कामे करण्यात यशस्वी ठरल्याचा गैरप्रचार विरोधक करीत असन ते कसे चुकीचे आहे, हे कार्यकर्ते मतदारांना समजावून सांगत आहेत. त्यामुळे संजय काकांच्या बद्दल गेल्या काही दिवसात जी नाराजी होती, ती ही दूर करण्यात या कार्यकर्त्यांना यश आल्याचे पहावयास मिळत आहे. एकंदरीत यंदाही संजय काका हॅट्ट्रिक करणार हा विश्वास सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे.