yuva MAharashtra ईव्हीएम बिघाडाचा खासदार तडस यांनाही फटका

ईव्हीएम बिघाडाचा खासदार तडस यांनाही फटका



| सांगली समाचार वृत्त |
देवळी - दि.२७ एप्रिल २०२४
देशभरात जगातील सर्वात मोठ्या लोकशाही पद्धतीतील निवडणुकीचा उत्सव साजरा होतो आहे परंतु या उत्सवात तांत्रिक कारणामुळे ईव्हीएम मशिनमध्ये बिघाडी उद्भवल्याने मतदारातून नाराजी व्यक्त होत आहे. चुकीचे मत नोंद होणे, मतच न नोंद होणे मतदान यंत्रात बिघाड अशा अनेक तक्रारी ठिकठिकाणी होऊन व्यक्त होत आहेत. या मतदान यंत्र बिघाडाचा खुद्द खासदार तथा महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना सुमारे पाऊण तास रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ आली.


यशवंत कन्या शाळेतील 185 क्रमांकाच्या केंद्रावर मतदान करण्यासाठी खासदार तथा उमेदवार रामदास तडस हे सकाळी 7 वाजता सहपरिवार आले. परंतु, मशीनमध्ये बिघाड आल्यामुळे त्यांना तब्बल पाऊण तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. शेवटी 7.45 वाजता तांत्रिक बाबी दुरुस्त करून मतदान सुरू झाले. खा. तडस यांनी आपल्या प्रतीक्षा क्रमांकानुसार मतदान केल्यानंतर निवडणूक कर्मचार्‍यांनी सुटकेचा श्‍वास घेतला. मतदारांच्या रांगेत सुद्धा वाढ झाल्याने प्रशासनासमोर प्रश्‍न निर्माण झाला होता. अशावेळी पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी मनोज नाप्ते आणि सहकार्‍यांच्या मदतीने स्थिती सांभाळली.