Sangli Samachar

The Janshakti News

संशोधकांनी बनवला सर्वात थंड मोठा रेणू



सांगली समाचार  - दि. १ एप्रिल २०२४
मुंबई  - संशोधकांनी आता यापूर्वी कधीही पाहण्यात न आलेला असा चार अणूंंचा एक रेणू बनवला आहे. अशा प्रकारचा हा सर्वात थंड रेणू आहे, हे विशेष. हे सोडियम पोटॅशियमचे एक विचित्र संयुग आहे. त्याचा अतिशय लांब असा रासायनिक बंध (अल्ट्रालाँग केमिकल बाँड) आहे. तो 134 नॅनोकेल्विन किंवा पूर्णपणे शुन्याच्या वरील अंशाचा केवळ 134 अब्जावा भाग आहे. या अल्ट्राकोल्ड मटेरियलची माहिती 'नेचर' या नियतकालिकात देण्यात आली आहे.

क्वांटम बिहेवियर समजून घेण्यासाठी असे अल्ट्राकोल्ड सिस्टीम्स उपयुक्त ठरत असतात. जे नियम अणुमधील कणांवर नियंत्रित ठेवतात त्यांना 'क्वांटम मेकॅनिक्स' म्हणतात. हे नियम विशेषतः कमी तापमानात आपला प्रभाव गाजवत असतात. शिवाय असा सेटअप संशोधकांना क्वांटम सिम्युलेशन्स तयार करण्यासाठी कणांच्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवताना उपयूक्त ठरतात. सुपरकंडक्टरशी संबंधित संशोधनातही याबाबतची माहिती उपयुक्त असते.


नेदरलँड्समधील ग्रोनिंन्जेन युनिव्हर्सिटीतील रोमन बौज यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले, सहसा लोक अणू किंवा आयन वापरून त्यांना काहीसे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यामुळे क्वांटम स्टेटस्चे तुलनेने मर्यादित आकडेच मिळतात. मात्र जर एखाद्या रेणूचे सर्व क्वांटम स्टेटस् ड्रॉ केले तर ते अधिक उपयुक्त बनतात. या प्रयोगातून असेच करण्यात आले आहे. हालचाल करणार्‍या अणूवर सर्व बाजूंनी लेसर बीम्स सोडून त्यांना थंड केले जाते. अणू हा प्रकाश शोषून घेतो आणि उत्तेजित क्वांटम स्टेटमध्ये जातो. त्यानंतर लगेचच मूळ स्थितीत येण्यासाठी ऊर्जा ऊत्सर्जित करतो.