| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२५ एप्रिल २०२४
मंगळवार दि.२३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६वा.कृष्णातीरी माई घाटावर (स्वामी समर्थ मंदीर) श्रीराम नवमीनिमित्त श्रीरामांच्या भव्य ५१ फूटी प्रतिमेसमोर १११११ दिव्यांच्या नेत्रदीपक रोषणाईचा दिपोत्सव सोहळा, महाआरती व आतिषबाजी आणि महेश हिरेमठ आणि कलाकार कोल्हापूर यांचा श्रीराम भजन व भक्तीगीत गायन असा भरगच्च कार्यक्रम पृथ्वीराज पाटील फौंडेशनने आयोजित केला होता. हजारो सांगलीकरांनी यावेळी दिप लावून पुन्हा एकदा श्रीराम भक्तींचा आनंद लुटला.
उपस्थितांचे स्वागत करताना पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'दि. २१ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीत पृथ्वीराज पाटील फौंडेशन व डॉ. पतंगराव कदम फौंडेशनने कल्पद्रुम क्रिडांगणावर अयोध्येच्या श्रीराम मंदीराची हुबेहुब प्रतिकृती उभी केली होती. त्यावेळी श्रीराम भक्ती उत्सवात लाखो सांगलीकरांनी सहभाग नोंदविला. सांगली आणि पंचक्रोशी श्रीराम नाम जयजयकार व रामभक्तींने दुमदुमून गेली. तीच अनुभूती पुन्हा श्रीराम नवमीनिमित्त कृष्णातिरी सांगलीकरांना पृथ्वीराज पाटील फौंडेशनने गेल्या वर्षापासून उपलब्ध करून दिली आहे. सांगली व पंचक्रोशीतील श्रीरामभक्तांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने मानवतावादी, शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या, बंधुभाव वृध्दीगंत करणाऱ्या या श्रीराम नवमी सोहळ्याला उपस्थित राहून आनंद लुटला. पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले,' यापुढे कायम दरवर्षी रामनवमीला हा उपक्रम अखंड चालत राहील. सांगलीकरांनी या उपक्रमात सहभागी होऊन दरवर्षी दिप लावून रामभक्तीचा आनंद लुटावा.'
कृष्णामाईच्या कुशीत दिपार्पण
प्रारंभी महेश हिरेमठ आणि कलाकारांचा श्रीराम भजन व भक्तीगीत गायनाच्या कार्यक्रमात हजारो सांगलीकरांनी मंत्रमुग्ध होऊन सलग दुसऱ्या वर्षी श्रीराम भक्तीचा आनंद लुटला. यावेळी श्रीराम भजन व भक्तीगीत गायक महेश हिरेमठ आणि कलाकारांचा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी विरेंद्र पृथ्वीराज पाटील, सौ. विजया पृथ्वीराज पाटील, डॉ. राजेंद्र मेथे, पुरुषोत्तम काकडे, आशिष शहा, बिपीन कदम व पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य,शितल सदलगे, प्रशांत कांबळे, सनी धोतरे, शुभम बनसोडे, आशा पाटील, सुवर्णा पाटील,भारती भगत, प्रियांका सदलगे,मिनाक्षी दुग्गे सच्चिदानंद कदम, महावीर पाटील, प्रशांत देशमुख, अजय देशमुख, आशिष चौधरी, श्रीधर बारटक्के, रघुनाथ नार्वेकर, अशोक रास्कर, अरविंद जैनापुरे, आनंद पाटील,अभि सुर्यवंशी व सांगलीकर नागरीक व खास करून महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.