Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील मोहन खोत यांचे घरी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्य संपन्न



सांगली समाचार - दि. १० एप्रिल २०२४
सांगली - श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार म्हणून सर्वत्र सुपरिचित. स्वामींचा भक्त महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


सांगलीमधील शंभर फुटी मार्गावरील आप्पासाहेब पाटील नगर येथे वास्तव्यास असलेले मोहन खोत कुटुंबिय स्वामीभक्त. प्रतिवर्षी त्यांच्या घरी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने संपन्न केला जातो. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्याचे आयोजन केले होते. यावेळी शहरातील श्री स्वामी समर्थ भक्तगण व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मराठा बिझनेस असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय चव्हाण, सांगली जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, तसेच असोसिएशनचे पदाधिकारी विश्वास पाटील, अक्षय साळुंखे, सिद्धेश्वर जाधव, विठ्ठल पाटील, सुशांत पवार, माणिक पवार तसेच सांगली येथील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. निलेश शहा त्याचप्रमाणे शहरातील ऑप्टिकल्स व्यावसायिकांचा समावेश होता.

यावेळी मोहन खोत यांचे वडील भाऊसो खोत यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले, तर सौ. मयुरी खोत यांनी भक्तांना प्रसादाचे वाटप केले.