| सांगली समाचार वृत्त |
कल्याण - दि.२८ एप्रिल २०२४
(विद्या कुलकर्णी यांचेकडून)
दिनांक 26.04.2024 रोजी सायंकाळी 07.00 वाजता कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रातील शिक्षक बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी कल्याण लोकसभेचे उमेदवार लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते त्यांच्या समवेत माजी आमदार मा. श्री आप्पा शिंदे, जिल्हाध्यक्ष मा. श्री नाना सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख मा. गोपालजी लांडगे, शहर प्रमुख महेशजी गायकवाड, नगरसेवक सुनील दादा वायले, चंद्रकांत पवार, विष्णू विशे सर, गणेश पाटील सर, प्रशांत भामरे सर, गोकुळ पाटील सर, धनाजी दळवी सर, दिगंबर बेंडाळे सर, जोहरे सर, प्रवीण लोंढे सर, अनिल पाटील सर, विजय पवार सर, एन एम भामरे सर, आर डी पाटील सर, अनिल बोरणारे सर, मेस्टा कोकण अध्यक्ष गजानन पाटील सर, मेस्टा ठाणे अध्यक्ष नरेश पवार सर, नगरसेविका मधुराताई काळे, महिला अध्यक्ष नूतन पाटील मॅडम महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे राज्य पदाधिकरी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, भाजपा शिक्षक आघाडी, कलाध्यापक संघ, शिक्षक क्रांती, शिक्षक परिषद, कास्टट्रायब संघटना, इत्यादी संघटना व अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक मेळाव्यात जवळपास 1500 शिक्षक बांधव उपस्थित होते त्यांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, 1160 कोटी अनुदान देण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांनी केले. त्याचा लाभ जवळपास 66 हजार शिक्षक बांधवाना झाला, जुनी पेन्शन योजना लवकर लागू होणार त्याकरिता राज्यातील सरकार सकारात्मक आहे आचारसंहिता संपल्यानंतर 26000 शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, वाढीव टप्पा देण्याकरीता प्रयत्न सुरु असून तो विषय देखील येत्या जून महिन्यात मार्गी लागेल.
विनाअनुदानावरून अनुदानावर भरती बंदी उठविण्याकरीता प्रयत्न सुरु आहेत असे सांगून आ. म्हात्रे म्हणाले की, संच मान्यतेतील निकषांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, आज पर्यंत 93 शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या घरातील वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीस मान्यता मिळवून दिल्या आहेत, कनिष्ठ महाविद्यालयातील 512 वाढीव पदास मान्यता मिळवून दिल्या, अनेक शिक्षक व शिक्षेकेतर बांधवांचे शालार्थ मिळवून दिले आहेत, अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करण्याकरीता प्रयत्न सुरु आहेत, आमदार स्थानिक विकास निधी 2023-24 अंतर्गत कोकण विभागात 1136 शाळांना Digital e-learning equiptment चे वाटप केले आहे. अशा अनेक विषयांवर आ. म्हात्रे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही मार्गदर्शन करून या निवडणुकीत आपण शिक्षक आहात, आपला मोलाचा वाटा निवडणुकीत असतो, आपण समाज घडविण्याचे कार्य करता. त्यामुळे आपण लोकांमध्ये जाऊन निवडणुकीची जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढवावा व मला विक्रमी मतांनी निवडून द्यावे अशी भावनिक साद शिक्षकांना घातली.