yuva MAharashtra सांगलीतील तरुणाच्या खून प्रकरणी अवघ्या बारा तासात, संशयितांच्या आवळल्या मुसक्या !

सांगलीतील तरुणाच्या खून प्रकरणी अवघ्या बारा तासात, संशयितांच्या आवळल्या मुसक्या !



सांगली समाचार - दि. १२ एप्रिल २०२४
सांगली - सांगली शहरातील गणपती मंदिरा जवळ झालेल्या राहुल साळुंखे या तरुणाच्या खून प्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे या खुणामधून नाजूक कारणे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चौकशीनंतर खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल यातील संशोधना 12 तासाच्या आत अटक करण्यात यश आल्याची माहिती सांगली शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

अनिकेत उर्फ मोन्या संजय सलगरे (वय १९), भूषण संजय एडके (वय २६), अक्षय चंद्रकांत सलगरे (वय २७ तिघेही राहणार गवळी गल्ली सांगली), अभिषेक सतीश भोजने (वय २०, रा. शामराव नगर सांगली) अशी अटक केलेल्या संशोधकांची नावे आहेत या प्रकरणी मूळत राहुलचा जखमी मित्र तेजस प्रकाश करांडे (वय २१ रा जामवाडी) सांगली यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.


बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास एका मुलीने भेटायला बोलावल्याने, मृत राहूल आणि त्याचा मित्र तेजस करांडे गणपती मंदिर जवळ गेले होते. त्यावेळी संशयीतांनी अचानक कोयते आणि धारदार हत्यारे घेऊन दोघांवर हे हल्ला चढवला. यामध्ये राहुलच्या पोट, पाठीवर, डोक्यावर वर्मी घाव बसल्याने तो जागी ठार झाला. तर त्याचा मित्र तेजस गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

घटना घडल्यानंतर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तसेच एलसीबी चे पथक संशयतांचा शोध घेत होते. सांगली शहर च्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील संतोष गळवे, गौतम कांबळे यांना खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार चौघा संशयीतांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्या नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचै आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार अधिक तपासत करीत आहेत.

या प्रकरणी सांगली शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, विनायक शिंदे, गणेश कांबळे, गौतम कांबळे, संतोष गळवे, संदीप कुंभार, योगेश सटाले, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने हे कारवाई केली.

गेल्या काही दिवसात शहरांमध्ये घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्यांच्या तातडीने मुसक्या आवळण्यात वरील सा-यांचा मोठा वाटा आहे. सदर गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.