| सांगली समाचार वृत्त |
डोंबिवली - दि.१८ एप्रिल २०२४
(विद्या कुलकर्णी )
महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती अखिल महिला परिषदेत जल्लोषात साजरी करण्यात आली. परिषदेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. मुख्याध्यापिका व पत्रकार असणाऱ्या प्रमुख पाहुण्या विद्या कुलकर्णी मॅडम यांनी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
महामानव डॉ .बाबासाहेबाच्या जीवन कार्याबद्दल माहिती देऊन, बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम, स्त्रियांबद्दलचे विचार सहज समजतील अशा पध्दतीने महिलांसमोर मांडले. तसेच परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल भरभरून कौतुक केले व मार्गदर्शनही केले.
यावेळी बोलताना कुलकर्णी मॅडम पुढे म्हणाल्या, मानवता हाच खरा धर्म आहे, संविधान विषयी आपण अभ्यास केला पाहिजे. यावर माहिती दिली. तसेच अर्चना आचरेकर यांनी गायलेल्या गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या विद्याताईचा सत्कार परिषदेच्या अध्यक्षा रेखा असोदेकर यांनी केला. सचिव वृषाली जोशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन साधना बावसे यांनी सुंदर पध्दतीने केले. विनता जोशी यांनी सुंदर गीत सादर केले. परिषदेच्या कोषाध्यक्षा सुषमा शेंडे व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.