| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात पहाण्यास मिळत आहे. प्रचाराचा कालावधी उमेदवारीच्या वादात गेला असली तरी कमी कालावधीत प्रचाराचा चांगलाच टप्पा त्यांनी पार केल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघात सर्वत्र दौरे, पदयात्रा आणि सभांचा सपाटा त्यांनी लावला आहे. प्रचारात त्यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, श्रीमती जयश्रीताई पाटील, सौ. पूजा पाटील, श्रीमती शौलाभाभी पाटील यांच्यासह सांगली, मिरजेतील सर्व माजी नगरसेवक, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, जिल्ह्यातील दादाप्रेमी कार्यकर्ते यांची चांगलीच साथ मिळत आहे. जिल्ह्यातील विविध संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जाहीरपणे त्यांना पाठिंबा देत आहेत. विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य दादाप्रेमी कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली असल्याचे एकूणच चित्र दिसत आहे.
काँग्रेसच्या परंपरेनुसार मंगळवार दि.२३ रोजी औदूंबर (ता. पलूस) येथे श्री दत्त मंदिरात विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. तत्पूर्वी विशालदादा पाटील यांनी पुणदी येथे हनुमान जयंतीनिमित्त जन्मकाळ सोहळ्यालाही उपस्थिती लावली. प्रचार शुभारंभावेळी दादासाहेब सूर्यवंशी, घनश्याम सूर्यवंशी, राजूकाका पाटील, शामरावआप्पा पाटील, शामराव नवले, विश्वनाथ मिरजकर, बाळासाहेब मगदूम, धैर्यशील पाटील, शहाजी गुरव, संभाजी गडदे, स्वाती मोटकट्टे, विजय चौगुले, गुंडा चौगुले, विशाल सूर्यवंशी, प्रताप पाटील उपस्थित होते.
जत तालुक्यातील रावळगुंडवाडी, दरिबडची येथे विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. तत्पूर्वी जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार घालून विशालदादा पाटील यांनी प्रचाराची सुरूवात केली. यावेळी बाजार समितीचे सभापती सूजय शिंदे, आप्पाराय बिराजदार, बसवराज बिराजदार, सरपंच बिराप्पा शिंदे, भाजपचे युवा नेते आनंदराव पाटील, चरमगौंडा पाटील, जाल्याळ खुर्दचे सरपंच भीमराव माने, दरिबडची माजी उपसरपंच शिवानंद माळी, ग्रामपंचायत सदस्य पिंटू माळी, सोसायटीचे चेअरमन पिंटू मासाळ, श्रीधर हिरगोंड, लिंगप्पा हिरगोंड यांच्यासह काँग्रेस, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवार दि. २४ रोजी आटपाडी तालुक्यातील करगणी, हिवतड, गोमेवाडी, तळेवाडी, बाळेवाडी, बनपुरी, लेंगरेवाडी, मासाळवाडी, माडगुळे, य. पा. वाडी येथे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका झाल्या. यावेळी जयदीप भोसले, डी. एम. पाटील, शिवाजी दबडे, मोहन खरात, चंद्रशेखर पाटील, माळेवाडी सरपंच मोहन जगताप, विजयसिंह पाटील, हिवतडचे सरपंच आनंदराव देशमुख, आटपाडी बाजार समितीचे उपसभापती राहूल गायकवाड, तळेवाडीचे नाना सरगर, दत्ता सरगर, हिराप्पा यमगर, आबा भूते, गणपत खरात, पांडूरंग कुकडे, श्रीमंत खरात, तानाजी कोळेकर, दत्ता खिलारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. यावेळी ठिकठिकाणी विशालदादा पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आली. गावातून पदयात्राही काढण्यात आली. करगणी येथे विशालदादा पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व नरवीर उमाजीराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. प्रसिद्ध श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्राचे दर्शनही घेतले.
दरम्यान, आटपाडी तालुक्यातील शेटफळे, खांजोडवाडी, लोणारवाडी, बोंबेवाडी, आंबेवाडी, पिंपरी खुर्द, देखमुख वाडी सोनारसिद्धनगर, कौठुळी, पुजारवाडी, मापटे मळा, पांढरेवाडी, भिंगेवाडी येथे विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका झाल्या. ठिकठिकाणी विशालदादा पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आली. गावातून पदयात्राही काढण्यात आली. या गावातून विशालदादा पाटील यांना मताधिक्य देण्याची ग्वाही उपस्थितांनी दिली. यावेळी जयदीप भोसले, डी. एम. पाटील, आटपाडी बाजार समितीचे उपसभापती राहूल गायकवाड, सुभाष गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, महादेव देशमुख, संभाजी गायकवाड, रुपेश गायकवाड, किशोर गायकवाड, यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
गुरूवार, दि. २५ रोजी तासगाव तालुक्यातील पाडळी, धामणी, आळते, लिंब, निंबळक, चिखलगोठण, बोरगाव, शिरगाव, विसापूर, वंजारवाडी, ढवळी, तुर्ची येथे विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बैठक, पदयात्रा काढण्यात आली. गावागावातून विशाल पाटील यांच्या उमेदवारीला उत्स्फुर्त प्रतिसादही मिळाला.
दरम्यान, सांगली शहरातील गावभाग परिसरात जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत प्रचार बैठका झाल्या. गावभाग परिसरातील कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. विशालदादा पाटील यांच्या प्रचार नियोजनाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. विशालदादांना वातावरण चांगले आहे. यंदाची निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. कार्यकत्यांनी चिन्ह घरोघरी पोहचविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. यावेळी मदनभाऊ युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, माजी नगरसेवक संतोष पाटील, राजेश नाईक, चिंटू पवार, प्रितम रेवणकर, संजय शिकलगार, उदय मुरगुडे, विशाल घुगरे, आशिष कोरी, शुभम बनसोडे, भूषण कर्नाळे, सचिन घेवारे, पुरुषोत्तम भिंगे, मयूर बांगर, सुरेश भोसले, आकाश भोसले, अवधूत गवळी यांच्यासह गावाभागातील नागरिक उपस्थित होते. तसेच तासगाव तालुक्यातील वासुंबे, पुणदी, बिरणवाडी, गौरगाव, बस्तवडे, आरवडे, मांजर्डे, हातनूर, पेड, मोराळे, हातनोली या गावांत विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका झाल्या. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रवी पाटील, मोहन पाटील, अमित पाटील, मोहन नाना पाटील, कमल पाटील, संभाजीराव खराडे, देवदत्त कांबळे, राजू मोरे, राजकुमार लंगडे, विशाल चांदूरकर, पंढरीनाथ मोरे, धनाजी पाटील, दिलीप सावंत, प्रसाद खराडे, राजू माळी, पंढरीनाथ वाघ, श्रीरंग वाघ, अरविंद शिंत्रे, सरपंच वर्षाराणी चव्हाण, विष्णू वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शुक्रवार, दि.२६ रोजी कुमठे येथे विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी कुमठे गावचे ग्रामदैवत श्री नरसिंह मंदिरामध्ये श्रीफळ बाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विशाल दादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी पूजा पाटील कुमठे गावच्या माजी सरपंच डॉक्टर भारती पाटील, मनीषा पाटील, छायाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, मनोज पाटील, नितीन पाटील, अच्युतराव पाटील, मा.पा. पाटील यांचा सहभाग होता. शनिवार, दि. २७ रोजी विशालदादा
पाटील यांच्या प्रचारासाठी अंकली , धामणी, इनामधामणी आणि बामनी या गावांना जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांनी भेटी दिल्या. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम दादा पाटील, मदन भाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, महाबीर मगदूम, सुहास पाटील, आदिनाथ मगदूम, प्रदीप मगदूम, नेमगोंडा पाटील, शशिकांत पाटील, सुरज मगदूम, भरत खवाटे, प्रमोद शेटे, गणपती कोळी, प्रधान सूर्यवंशी, शांतिनाथ पाटील, सचिन कोळी, हिम्मत कोळी, विनोद सूर्यवंशी, निखिल कोथळे, प्रवीण पाटील, सुकुमार पाटील तसेच मदनभाऊ पाटील युवा मंचचे सर्व पदाधिकारी गावातील ज्येष्ठ नागरिक महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, खानापूर शहरात विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पुजा पाटील यांनी महिला, नागरिकांशी संवाद साधला. खानापूरातील अडीअडचणी, समस्याही जाणून घेतल्या. यावेळी मारुती भगत, बापू गिडे, अजित पवार, संजय भगत, अभिजित टिंगरे, हर्षल तोडकर, गीतांजली पाटील उपस्थित होते.
तसेच मिरज पूर्व भागातील एरंडोली, खंडेराजुरी, मल्लेवाडी, शिपूर, डोंगरवाडी, बेळंकी, संतोषवाडी, कदमवाडी, जानराबवाडी, सलगरे, चाबुस्कारवाडी, खटाव, लिंगनूर, सोनी, पाटगाव, करोली एम, भोसे, कळंबी, टाकळी, बोलवाड येथे विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका, सभा झाल्या. यावेळी विशालदादा पाटील, अजितराव घोरपडे यांच्यासह अनिता कदम, रमेश कदम, उमेश पाटील, शीतल पाटील, पोपट नरसाप्पा, धनजंय जगदाळे, संजय जगदाळे, उत्तम हराळे, बंडू चौगुले, कळंबीचे सरपंच योगेश पाटील, उपसरपंच स्वप्नील पाटील, सुभाष पाटील, प्रमोद इनामदार, बाळासाहेब पाटील, माणिकताई माळी, सुभाष खोत, विज्ञान माने आदि उपस्थित होते.
रविवार, दि.२८ रोजी विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. यावेळी प्रभाग क्रमांक दहा मध्ये माजी नगरसेवक प्रकाश मुळके, वर्षाताई अमर निंबाळकर, शेवंताताई वाघमारे, अशोक मासाळे, यशवंत माळी, राजू मुळे यांच्यासह टिंबर एरिया मर्चड असोसिएशन या ठिकाणी बैठका पार पडल्या. या बैठकीला भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बुधगाव येथील सिद्धेश्वर मंदिरातून देवाच्या आशीर्वाद घेऊन प्रचारास सुरुवात केली. यावेळी मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, आनंदराव काका पाटील बाळासाहेब पाटील, निवास पाटील, प्रवीण पाटील, अनिल डुबल, राम खुटे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं
उपस्थित होते. तसेच बेडग येथे विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, अमरसिंह पाटील, संजय हजारे, संजय मेंढे, बाळासाहेब ओमासे, प्रमोद इनामदार, निरंजन आवटी, तानाजी चव्हाण आदिसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीमती शैलजा भाभी पाटील यांनी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ दिवंगत प्रकाशबापू पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मिरजेचे माजी महापौर विजय धुळ्बुळू, ज्येष्ठ नेते कल्लाप्पांना लड्डे, पी. एल. राजपूत, दयाधन सोनवणे, माजी उपमह मेथे, अशोक राज डी. पी. बनसोडे, चंद्रकांत मोरे, माज चौधरी, शंकर कोळेकर 2
विशालदादा पाटील यांनी शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणा-या नागरिकांशी संवाद साधत जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केली. यावेळी त्यांनी आमराई व महावीर उद्यानाला भेट दिली. तसेच वृत्तपत्र विक्रेते, खेळाडू, हमाल, फळ विक्रेत्यांसह विविध संघटनांशी संवाद साधला. जिल्ह्यातील विविध संघटनांचा पाठिंबा विशाल पाटील यांना मिळत आहे. पुरोगामी पक्ष, जिल्हा पान असोसिएशन, बंडखोर सेना पक्ष, बहुजन परिवर्तन पार्टी, राष्ट्रीय चर्मचार महासंघ, मराठा स्वराज्य संघ, नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ, संभाजी ब्रिगेड, रिपाइं गवई गट, मिरज सुधार समिती आदी पक्ष आणि संघटनांनी त्यांना जाहिर पाठिंबा दिला आहे.
विशाल पाटील यांनी लोकसभा मतदार संघातील जत, कवठेमहांकाळ, खानापूर, विटा, मिरजपूर्व भागातील मतदारांपर्यंत पोहचण्यात यश मिळावले आहे. मिरजपूर्व भाग, कवठेमहांकाळ, खानापूर याभागातून विशाल पाटील यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची तर जत तालुक्यातून माजी आमदार विलासराव जगताप यांची चांगलीच साथ मिळत आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघातून श्रीमती जयश्रीताई पाटील, सौ. पूजा पाटील, श्रीमती शैलाभाभी पाटील यांनी प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली आहे. त्यात सांगली शहरातील माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांच्यासह मदनभाऊ पाटील युवा मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचाराचा झंझावात सुरूच ठेवला आहे.