yuva MAharashtra टाटा पॉवरच्या इव्ही चार्जिंग नेटवर्कने १० कोटी हरित किलोमीटरचा टप्पा केला पार

टाटा पॉवरच्या इव्ही चार्जिंग नेटवर्कने १० कोटी हरित किलोमीटरचा टप्पा केला पार



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१६ एप्रिल २०२४
भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक वीज कंपन्या आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सोल्युशन्स पुरवणाऱ्यांपैकी एक, टाटा पॉवरने सार्वजनिक, अर्ध-सार्वजनिक, बस/फ्लीट आणि संपूर्ण भारतातील होम चार्जर विभागात १० कोटी (१०० मिलियन) हरित किलोमीटरपर्यंत वीज पोहोचवणारी पहिली इव्ही चार्जिंग सोल्युशन्स पुरवठादार बनण्याचा मान मिळवला आहे. हे यश देशभरात शाश्वत मोबिलिटी सुविधांना प्रोत्साहन देण्यात टाटा पॉवर निभावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते.

वर्ष २०३० पर्यंत देशात होत असलेल्या वाहनांच्या एकूण विक्रीपैकी ३०% विक्री इलेक्ट्रिक वाहनांची असावी हे उद्दिष्ट घेऊन भारताने पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे व्हिजन आखले आहे. FAME आणि नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन यासारख्या योजनांच्या माध्यमातून इ-मोबिलिटीला चालना दिली जात आहे. इव्ही चार्जिंग सुविधांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन या परिवर्तनासाठी पायाभूत आवश्यकता म्हणून टाटा पॉवरने इझी चार्ज या नावाने आपल्या नेटवर्कमध्ये ८६००० पेक्षा जास्त होम चार्जर, ५३०० पेक्षा जास्त सार्वजनिक, निम-सरकारी आणि फ्लीट चार्जिंग पॉईंट्ससह ५३० शहरांमध्ये ८५० पेक्षा जास्त बस चार्जिंग स्टेशन्सचा समावेश केला आहे. वाहनचालकांच्या सुविधेसाठी हे चार्जर हायवे, हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल्स, कार्यालये, गृहसंकुले इत्यादी वेगवेगळ्या आणि भरपूर वाहतूक असलेल्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. टाटा पॉवरचे हे प्रयत्न भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वेगवान वाढीला पूरक ठरत आहेत.


उद्योगक्षेत्रातील एका अनुमानानुसार, वर्ष २०३० पर्यंत भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वार्षिक विक्री १ कोटींपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. टाटा पॉवर, देशभर पसरलेल्या आपल्या नेटवर्कसह या परिवर्तनामध्ये सर्वात आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि इव्ही चार्जिंगच्या पायाभूत सेवांच्या मागणीतील वाढीबरोबरीनेच टाटा पॉवर आरएफआयडी कार्डसारख्या अनेक तंत्रज्ञान - सक्षम ग्राहककेंद्री सुविधा आणत आहे. या कार्डमार्फत वायरलेस पेमेंट करून इव्ही मालक खूपच सहजपणे tap.charge.go करू शकतात.

शून्य उत्सर्जन मोबिलिटीप्रती अतूट निष्ठेचे पालन करण्यासाठी टाटा पॉवरला 'शून्य इन्फ्रास्ट्रक्चर चॅम्पियन' हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. नुकताच नवी दिल्लीत दुसऱ्या वार्षिक शून्य फोरममध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीती आयोगाने २०२१ साली सुरु केलेल्या शून्य - झिरो पोल्युशन मोबिलिटी कॅम्पेनने अनेक महत्त्वपूर्ण भागीदारींना प्रोत्साहन दिले आहे. यामध्ये भारत सरकारचा नागरिकांना सहभागी करून घेणारा, जोडून ठेवणारा मंच MyGov आणि जवळपास २०० उद्योग भागीदार आहेत.