yuva MAharashtra खर्च निरीक्षक संजीव कुमार यांची प्रसार माध्यम कक्षास भेट

खर्च निरीक्षक संजीव कुमार यांची प्रसार माध्यम कक्षास भेट



सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
सांगली - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रसार माध्यम कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षास आज ४४-सांगली लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी भेट देऊन पाहणी करून कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. 


तत्पूर्वी खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवार व राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष आणि मतदार मदत केंद्रास भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेवून आवश्यक सूचना दिल्या यावेळी खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, खर्च निरीक्षक -नोडल अधिकारी शिरीष धनवे उपस्थित होते.