सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या या हंगामात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीच्या वातावरणात कधी काय होईल हा अंदाज लावणं कठीण झालं आहे. राजकीय विश्लेषकांचेही काही अंदाज खोटे ठरत आहेत. दरम्यान, हवामानाचा अचूक अंदाज सांगण्याची ज्यांची हातोटी आहे, असे पंजाबराव डख (Panjabrao dakh) हेदेखील या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. ते परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.
पंजाब डख परभणीतून निवडणूक लढवणार
पंजाबराव डख हे परभणीतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. याबाबत खुद्द डख यांनीच अधिक माहिती दिली आहे. समाजमाध्यम तसेच अन्य माध्यमांतून पंजाब डख हे महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज सांगतात. त्यांनी सांगितलेला हा अंदाज अनेकवेळा अचूक ठरतो, असे शेतकऱ्यांना वाटते. म्हणूनच ते कमी काळात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. ते परभणीतून निवडणूक लढवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ते अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीकडून जानकर यांना तिकीट
गेल्या काही दिवसांपसून परभणी हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. कारण या जागेवर महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. जानकर हे महाविकास आघाडीतून निवडणूक लढवतील, असा अंदाज लावला जात होता. त्यांना माढ्यातून तिकीट दिले जाऊ शकते असे सांगितले जात होते. मात्र ऐनवेळी महायुतीने त्यांनी परभणीतून उमेदवारी दिली आहे. महायुतीने मात्र अद्याप येथे आपला उमेदवार दिलेला नाही.
पंजाबराव डख कोण आहेत?
पंजाराव डख हे हवामानाविषयी माहिती देतात. पेरणी कधी करावी, हवामान काय असू शकते याबाबतची माहिती ते आपल्या समाजमाध्यम खात्यांतून देतात. महाराष्ट्रात त्यांनी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजावर अनेक शेतकरी, नागरिक विश्वास ठेवतात. ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध आहेत. हवामानाविषयीची कोणतीही नवी माहिती असल्यास ते आपल्या समाजमाध्यम खात्याच्या रुपात लोकांना शेअर करतात.
पंजाबराव डख यांचा विजयाच अंदाज खरा ठरणार का?
परभणीत जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. पण पंजाबराव डख यांनीदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निश्चय व्यक्त केल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरतोय. पंजाबराव डख यांच्या हवामानाचा अंदाज गंभीरपणे घेणारे शेतकरी, सामान्य लोक त्यांना निवडणुकीत मतदान करणार का? पंजाबराव डख यांचा विजयाचा अंदाज खरा ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, हवामानाचा अचूक अंदाज सांगण्याची ज्यांची हातोटी आहे, असे पंजाबराव डख (Panjabrao dakh) हेदेखील या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. ते परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.