नवी दिल्ली - आजकाल काहीही खरेदी करायचं म्हटलं, की अनेकजण ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. ऑनलाईन खरेदीसाठी अनेक वेगवेगळ्या साईट उपलब्ध आहेत. यामुळे लोक आपला खरेदीसाठी जाण्याचा वेळ वाचवत अनेकदा घरबसल्या शॉपिंग करतात. ऑनलाईन शॉपिंगमध्ये काही साईट्स अतिशय प्रसिद्ध आहेत, त्यातीलच एक आहे Amazon. अनेक लोक यावरुन शॉपिंग करतात. मात्र, तुम्ही कधी त्यांचा लोगो पाहिलाय का?
कंपनीने आपल्या लोगोमध्ये एक वाकडा बाण वारला आहे. या बाणाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? खरं तर हा एक मोठा मेसेज आहे, ज्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना Amazon वापरायला आवडतं परंतु त्याच्या लोगोमध्ये लपलेलं रहस्य माहित नसेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. मात्र, याचा अर्थ सांगण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की ॲमेझॉन कोणी आणि केव्हा सुरू केलं. जेफ बेझोस यांनी 5 जुलै 1994 रोजी अमेरिकेत Amazon सुरू केलं. तेव्हापासून आज ते कुठे पोहोचलं आहे, हे तुम्हा सर्वांना माहित असेलच. त्याचा लोगोही वेळोवेळी बदलला आहे. लुक-ए नावाच्या वेबसाइटनुसार, आजकाल जो लोगो आपण पाहतो तो 2000 सालापासून लागू करण्यात आला होता, त्यापूर्वी दुसरा लोगो होता.
मिरर वेबसाइटनुसार, द स्मॉल बिझनेस ब्लॉगचे लेखक स्पेन्सर म्हणाले, की लोगो ही कंपनीची ओळख असते आणि त्याचा वापर त्याच्या ग्राहकांच्या मनात त्यांच्याबद्दल भावना निर्माण करण्यासाठी केला जातो. ॲमेझॉनचा लोगोही हेच काम करतो. तो साधा आहे, पण संदेश पोहोचवण्यात खूप प्रभावी आहे. लोगोमध्ये Amazon हा शब्द लिहिलेला आहे, ज्याची गणना जगातील सर्वात लांब नद्यांमध्ये केली जाते.
या नावाच्या अगदी खाली, एक वाकलेल्या बाणाचं चिन्ह आहे, जे प्रत्यक्षात स्मायलीसारखं दिसतं. म्हणजे याचाच अर्थ हसणारा चेहरा. हा बाण अक्षर A पासून Z अक्षरापर्यंत बनवला आहे. याचा अर्थ ते A ते Z पर्यंत सगळं दाखवत आहे. याद्वारे तुम्हाला लोगोचा अर्थ समजला असेल, की ग्राहकांना सांगितलं जात आहे की या कंपनीमध्ये तुम्हाला A ते Z पर्यंत सर्व काही मिळेल. सोप्या शब्दात सांगायचं तर आवश्यक असलेली प्रत्येक वस्तू तुम्हाला Amazon वर मिळेल. या कारणास्तव हा बाण A ते Z पर्यंत आहेत.