yuva MAharashtra सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 63 हजार 278 मतदार

सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 63 हजार 278 मतदार



सांगली समाचार - दि. ९ एप्रिल २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदार संघातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार असून ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर आहे. यासाठी मतदार संघात एकूण 18 लाख 63 हजार 278 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार नऊ लाख 50 हजार 710 आहेत. स्त्री मतदार नऊ लाख 12 हजार 458 आहेत. यावेळी 110 तृतीयपंथीय ही आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2024 असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2024 अशी आहे. 


सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ७ मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर ४ जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून नुकतीच राजकीय पक्षांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पार पाडली आहे.

लोकशाही बळकटीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांना आवाहन केले आहे की, अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा. निवडणूक आयोगातर्फे यंदा जे दिव्यांग किंवा मतदार केंद्रावर येऊन मतदान करू शकणार नाहीत, अशांसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचाही संबंधित मतदाराने अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन डॉ. दयानिधी यांनी केले आहे. 

दरम्यान यंदा उन्हाची तीव्रता नेहमीपेक्षा अधिक असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी सावलीची तसेच प्रथमोपचाराची व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दया राजानिधी यांनी दिली.