yuva MAharashtra वय 111 वर्षे 222 दिवस. नॉटआऊट

वय 111 वर्षे 222 दिवस. नॉटआऊट


सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - जॉन टिनिसवुड 2 एप्रिल रोजी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले. खरे तर या आठवडय़ात व्हेनेझुएलाच्या 114 वर्षीय जॉन व्हिसेंट पेरेझ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर टिनिसवुड जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले आहेत. 


जॉन टिनिसवुड यांनी त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य उघड करत सांगितले की, ते आठवडय़ाच्या शुक्रवारी मासे आणि चिप्स खातात. प्रत्येक गोष्टीत संयम राखण्यातच दीर्घायुष्याचे रहस्य आहे, असेही ते म्हणाले. जॉन टिनिसवुड यांचा जन्म 1912 मध्ये मर्सीसाइड, इंग्लंड येथे झाला. जॉन हे व्यवसायाने निवृत्त लेखापाल आणि टपाल सेवा कर्मचारी आहेत. त्यांचे वय 111 वर्षे 222 दिवस आहे. टिनिसवुड साऊथ पोर्ट, मर्सीसाइड इंग्लंडमध्ये एका केअर होममध्ये राहतात.