सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
देशभरात सिम कार्डशी संबंधित कायदे हळूहळू कडक होत आहेत. नुकतंच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) मोबाईल सिम कार्डसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. हे नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत. आता सिम कार्डशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, भारतात एका आयडीवर आपण 9 सिम कार्डचा वापर एकाच वेळी करू शकतो. अनेकदा तर आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा नातेवाईकांना आपल्या नावाने सिम कार्ड देतो. आता प्रश्न असा पडतो की, तुमच्या नावावर किती सिम कार्ड अॅक्टिव्ह आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर नेमकं काय करावं? कसं कळणार? तर, याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
यासाठी तुम्हाला सर्वात आधी https://tafcop.sancharsaathi.gov.in/ या वेबसाईटवर जावं लागेल. यानंतर या ठिकाणी तुम्हाला 10 अंकी मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल.
एकदा तुम्ही ओटीपी एन्टर केल्यानंतर, तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि त्यानंतर संपूर्ण लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल. या लिस्टमध्ये तुमच्या नावावर अॅक्टिव्ह असलेले सर्व सिम कार्ड नंबर्स तुम्हाला तुमच्यासमोर दिसतील. तुमच्या नावावर ॲक्टिव्ह असलेल्या सिम कार्डची लिस्ट तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर दिसली, पण यामध्ये तुम्हाला तुमच्या पोर्टलवर अॅक्टिव्ह असलेला नंबर दिसला पण जर तुम्ही तो नंबर वापरत नसाल तर तुम्ही त्या नंबरशी संबधित तक्रार करू शकतात. त्यानंतर सरकारकडून तो नंबर ब्लॉक करण्यात येईल.
अनेकदा आपल्याला टेक्नॉलॉजी, मोबाईल, सिम कार्डशी संबंधित अनेक गोष्टींबाबत पुरेशी माहिती नसते. पण, हे सर्व गॅजेट्स आपण आपल्या दैनंदिन जीवनात रोज वापरतो. मात्र, पुरेशी माहिती नसल्या कारणाने तुमची फसवणूकही होऊ शकते. तसेच, सायबर गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत चाललं आहे. अशा वेळी ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी जर तुम्हाला या संबंधित अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करू शकता. तुम्हाला तुमच्या नावावर अॅक्टिव्ह असलेल्या सर्व सिम कार्डची माहिती अगद सहज उपलब्ध होईल.