सांगली समाचार - दि. १९ मार्च
नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) ने आपल्या कोट्यवधी क्रेडिट कार्ड ग्राहकांना धक्का दिला आहे. SBI कार्डने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. हे नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील. या नवीन नियमानुसार, SBI क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट केल्यावर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत. 1 एप्रिलपासून ठराविक क्रेडिट कार्डांवर हा नियम लागू होईल, तर 15 एप्रिल 2024 पासून उर्वरित कार्ड्सवर लागू होईल.
1 एप्रिल 2024 पासून या SBI कार्डांद्वारे रेंट पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत
ऑरम एसबीआय कार्ड
एलाईट एसबीआय कार्ड
एलाईट अॅडव्हान्टेज एसबीआय कार्ड
पल्स एसबीआय कार्ड
सिंप्ली क्लिक अॅडव्हान्टेज कार्ड
एसबीआय कार्ड प्राइम ॲडव्हांटेज
एसबीआय कार्ड प्लॅटिनम
एसबीआय कार्ड प्राइम प्रो
एसबीआय कार्ड शौर्य सिलेक्ट
एसबीआय कार्ड प्लॅटिनम ॲडव्हान्टेज
डॉक्टर एसबीआय कार्ड
गोल्ड एसबीआय कार्ड
गोल्ड क्लासिक एसबीआय कार्ड
गोल्ड डिफेन्स एसबीआय कार्ड
कर्नाटक बँक एसबीआय कार्ड
अलाहाबाद बँक एसबीआय कार्ड
15 एप्रिल 2024 पासून या SBI कार्डांद्वारे रेंट पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.
एअर इंडिया प्लॅटिनम कार्ड
एअर इंडिया सिग्नेचर कार्ड
आदित्य बिर्ला एसबीआय कार्ड
बीपीसीएल एसबीआय कार्ड
आयआरसीटीसी एसबीआय कार्ड
फॅब इंडिया एसबीआय कार्ड
क्लब विस्तारा एसबीआय कार्ड
सेंट्रल एसबीआय कार्ड
वरील कार्ड्सशिवाय SBI चे इतर काही कार्ड्स आहेत, ज्यावर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून रेंट पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.