Sangli Samachar

The Janshakti News

सांगली महापालिकेच्या एका स्वच्छता कामगार महिलेवर दोघां मुकादमांकडून अत्याचार केल्याने खळबळ



सांगली समाचार - दि. ६ मार्च २०२४
सांगली - ज्या ठिकाणी गरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून संस्काराचे धडे दिले जातात, त्या सरस्वती मंदिरात अर्थात महापालिकेच्या चांदणी चौक येथील प्राथमिक शाळा क्र. ३४ मधील एका खोलीत स्वच्छता कामगार महिलेवर दोन वेळा अत्याचार केल्याची घटना उघड आल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली महापालिकेकडील स्वच्छता विभागातील मुकादम वैभव कांबळे आणि निखिल कोठावळे यांनी एका सफाई कामगार महिलेस "तू व्यवस्थित काम करत नाहीस, तुझ्या विरोधात महापालिकेत तक्रार दाखल करेन" अशी धमकी देऊन अत्याचार केला.


पीडित महिला ही चांदणी चौकात असलेल्या महापालिका शाळा क्र. ३४ मधील आवारातील खोलीत असलेले स्वच्छता साहित्य आणण्यासाठी गेले असता, जानेवारी महिन्यात पहिल्यांदा मुकादम वैभव कांबळे यांने अत्याचार केला, तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा निखिल कोठावळे याने ही स्वच्छता कामगार महिला शाळेत स्वच्छ काही सहित आणण्यासाठी गेल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला.
ही घटना कोणास सांगितलेस तर तुझ्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करेन अशी धमकी दिली होती. त्यामुळे महिलेने घाबरून हा प्रकार कोणास सांगितलं नव्हता. परंतु पीडित महिलेने दि. 4 मार्च रोजी फिनेल घेतल्याने हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला. आणि त्यानंतर वैभव कांबळे व निखिल कोठावळे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयताना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.