Sangli Samachar

The Janshakti News

सतेज पाटलांना भाजपच्या प्रचाराचा संशय; थेट निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार




सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४
कोल्हापूर  - गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पीएम किसान योजना आणि उज्वला गॅस योजनेसंदर्भातील ऑडिओ रेकॉर्डिंग कॉल हे व्हाॅट्सॲपवर व्हायरल होत आहेत. पीएम किसान योजना आणि उज्वला गॅस योजनेतील लाभ मिळालेल्या व्यक्तींना खासगी कॉल सेंटर यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नावाचा उल्लेख करून कॉल करणे सुरू आहे. 

संबंधित व्यक्तींना पीएम किसान योजना आणि उज्वला गॅस योजनेतून लाभ मिळाला आहे का ? त्याबाबत तुम्ही समाधानी आहेत का ? असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यावरून आता काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांना वेगळाच संशय आला आहे. त्यांनी भाजपच्या प्रचार पद्धतीवर संशय व्यक्त करून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.



शासकीय योजनांसाठी कलेक्ट केलेला डाटा खासगी कॉल सेंटर आणि विशिष्ट पक्षाकडे कसा ? संबंधित पक्षाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी डाटाचा वापर केला जात आहे, असा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी भाजपवर केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. पीएम किसान, उज्वला गॅस अशा योजनांच्या माहितीसाठी खासगी कॉल सेंटरमधून नागरिकांना फोन येत असल्याचा दावा सतेज पाटील यांचा आहे. या माध्यमातून काही गोपनीयता राहणार आहे की नाही ? त्याचा भंग केला जात असल्याचेही सतेज पाटील  यांनी सांगितले. दरम्यान, सतेज पाटील यांनी केलेल्या या आरोपावर भाजपच्या नेत्यांकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का ? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.



(