सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
मुंबई - सध्याच्या आधुनिक जगात प्रत्येकजण इंटरनेट, मोबाईल वापरकर्ता आहे. प्रत्येकजण त्याचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट मोबाईलमध्ये सेव करून ठेवतो. मग तो फोटो, मॅसेज किंवा इतर कोणतीही फाईल असो, गुगल ड्राइव्हवर सेव केली जाते. स्वत:चा डेटा दुसऱ्याच्या हातात जाण हे खूप धोकादायक असते. त्याच्या चुकीच्या परिणामांच्याबाबी आपण सगळ्यांनी ऐकल्या आहेत. असाच अलर्ट गुगलकडून जारी करण्यात आला आहे. वापरकर्त्यांना गुगल ड्राइव्ह वर स्पॅम हल्ल्यांचा धोका वाढल्याचा अलर्ट दिला गेला आहे. वापरकर्त्यांच्या गुगल ड्राइव्हमध्ये काही संशयास्पद फाइल्स ॲड झाल्याचं गुगलने म्हटलं आहे. काही युजर्सना त्यांच्या गुगल अकाउंटवर काही फाइल्स आढळल्या आहेत, ज्या द्वारे त्यांना सातत्याने फाइल्स स्वीकारण्यास सांगितले जात आहे. या फाइल्स प्रत्यक्षात मालवेअर किंवा फिशिंग हल्ले असू शकतात, असे गुगलने म्हटले आहे. ज्यामुळे तुमच्या डिव्हाइसला आणि डेटाला हानी पोहोचवू शकते.
गुगलने पुढे म्हटले आहे की, तुम्हालादेखील अशी कोणतीही संशयास्पद फाइल आढळल्यास ती त्वरित स्पॅम श्रेणीमध्ये टाका. कोणत्याही लिंक किंवा डॉक्युमेंटवर क्लिक करू नका, आणि जरीही तुम्ही चुकून अशा संशयास्पद फाइल्स स्वीकारल्या असतील तरी घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही त्या फाइलची तक्रार गुगलकडे करू शकता.
स्मार्टफोनवर तक्रार कशी करावी -
तुमच्या स्मार्टफोनवर फाइल आल्यास, स्क्रीनच्यावर तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा आणि नंतर "Report" पर्याय निवडा.
संगणकावर रिपोर्ट कसा द्याल: जर तुम्ही तुमच्या संगणकावर फाइल उघडली असेल, तर त्यावर राइट क्लिक करा. यानंतर तुम्हाला "Block" किंवा "Report" चा पर्याय दिसेल, जो तुम्ही निवडू शकता.
लक्षात ठेवा, विशेष काळजी घेऊन तुम्ही तुमचा गुगल ड्राइव्ह आणि डेटा सुरक्षित ठेवू शकता. कोणतीही अज्ञात फाइल स्वीकारण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. असे गुगलने अलर्टमध्ये म्हटले आहे.