सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
नवी दिल्ली - देशात सात टप्प्यांत होणाऱया लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली. यामुळे 21 राज्यांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 27 मार्च आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 28 मार्च रोजी होणार असून, 30 मार्चपर्यंत माघार घेता येईल.
कुठल्या राज्यांत मतदान…
महाराष्ट्र (रामटेक, नागपूर, भंडारा, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर), अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, प. बंगाल, जम्मू आणि कश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी.
बिहारमध्ये थोडा बदल
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 40 पैकी 4 जागांवर औरंगाबाद, गया, नवाडा आणि जमुई येथे निवडणूक होईल. मात्र, बिहारमध्ये होळीमुळे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 28 मार्च ठेवण्यात आली आहे. 30 मार्च रोजी छाननी आणि 2 एप्रिलपर्यंत येथील उमेदवार माघार घेऊ शकतील.