yuva MAharashtra सांगली लोकसभा निवडणूक चौरंगी : आता प्रकाश शेंडगेही मैदानात

सांगली लोकसभा निवडणूक चौरंगी : आता प्रकाश शेंडगेही मैदानात


मुंबई - ओबीसी बहुजन पार्टीचा कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज यांना, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघात पाठिंबा राहणार आहे. मी स्वत: सांगली लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेत त्यांनी नऊ उमेदवारांची घोषणाही केली. हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या मतदार संघातून मनीषा डांगे व प्रा. संतोष कोळेकर इच्छुक असल्याने पुढील दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे, असे शेंडगे यांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बहूजन पार्टीचा शनिवारी (दि.30) कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग येथे दुपारी 12 वा .मेळावा होणार आहे.


जाहीर केलेले उमेदवार

बारामती : महेश भागवत
परभणी : अ‍ॅड. हरिभाऊ शेळके
हिंगोली : अ‍ॅड. रवी शिंदे
नांदेड : अ‍ॅड. अविनाश भोसीकर
यवतमाळ : प्रशांत बोडखे
बुलढाणा : नंदू लवंगे
शिर्डी : डॉ. अशोक आल्हाट