सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
नवी दिल्ली - 'त्यांना राजकीय नेत्यांवर कोणतीही कारवाई नको आहे. ममतादीदींच्या नेत्याच्या घरी कारवाई झाली तेव्हा 55 कोटी रुपये सापडले. काँग्रेस नेत्याच्या घरी 155 कोटी संपत्ती सापडली. एसबीआय बँकेचे कर्मचारी पैसे मोजून मोजून थकले, मशीन गरम झाल्या. हे पैसे कुठून आले हे राहुल गांधी सांगितलं का? असा परखड सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थितीत केला.
'नेटवर्क 18'च्या रायझिंग समिटमध्ये आज भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले होते. नेटवर्क 18 चे संपादक राहुल जोशी यांनी अमित शहा यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी अमित शहा यांनी ईडीच्या कारवाईबद्दल आपली भूमिका मांडली.
भाजपच्या नेत्यांवर ईडी (ED) कारवाई करत नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मोदी सरकार आल्यानंतर काळा पैसा हद्दपार करण्यासाठी काम केलं जात आहे. ईडीने ज्या काही संपत्ती आणि मालमत्ता जप्त केल्या आहे, त्यामध्ये फक्त 5 टक्के राजकीय पक्षाशी संबंधीत नेत्यांची संपत्ती आहे. 95 टक्के संपत्ती ही काळा पैसा जमा करणाऱ्यांची संपत्ती आहे. त्यांना राजकीय नेत्यांवर कोणतीही कारवाई नको आहे.
ममतादीदींच्या नेत्याच्या घरी कारवाई झाली तेव्हा 55 कोटी रुपये सापडले. काँग्रेस नेत्याच्या घरी 155 कोटी संपत्ती सापडली. एसबीआय बँकचे कर्मचारी पैसे मोजून मोजून थकले, मशीन गरम झाल्या. जर नेत्यांच्या घरातून कोट्यवधी सापडत असतील ते कुठून आले. जनता काही पाहत नाही का, पैसे भरण्यासाठी टेम्पो आणावा लागतो, एक भरला तर दुसरा आणावा लागतो. काँग्रेसच्या घरातून कोट्यवधी रुपये सापडतात याबद्दल राहुल गांधी सांगणार नाहीत का? असा सवाल शहांनी केला.
'भाजपच्या नेत्यांवर कारवाई का नाही? तर तुम्ही कोर्टात जा, आम्ही विरोधक होतो तेव्हा जनहित याचिका दाखल केल्या होत्या. 82 पीआयएल केले होते, त्यापैकी 35 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. तुमच्या सरकारने गुन्हे दाखल केले होते. जर हिंमत असेल तर कोर्टामध्ये जा. 1200 कोटींचा घोटाळा करणारी इंडिया आघाडी चुकीची माहिती देत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर आजपर्यंत कुणीही 25 पैसे घोटाळा केल्याचा आरोप करू शकत नाही' असंही शहांनी ठणकावून सांगितलं.
मागील 10 वर्षांमध्ये अनेक वर्षांपासून रखडलेले अनेक प्रश्न जसे, कलम 370, राम मंदिराचं निर्माण, बाबा विश्वनाथ कॉरिडॉर आणणे, ट्रिपल तलाक संपवणे, सीएए आणणे असे अनेक निर्णय ज्याला कुणी हात लावण्यासाठी हिंमत दाखवत नव्हतं. ते सगळे निर्णय हे मोदी सरकारने घेतले आहे. भारत हा काश्मिर, ईशान्य भारत, माओवादी या तिन्ही समस्याने ग्रासलेला होता. पण आता तिन्ही ठिकाणी मोदी सरकारने मोठं काम केलं आहे. 75 टक्के हिंसा कमी झाली आहे, असेही ते म्हणाले.