सांगली समाचार - दि. ६ मार्च २०२४
मिरज - भारतीय जनता पक्षाच्या वतीने शक्ती वंदन अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील संपर्क कार्यालयापासून विश्रामबाग येथील सांगलीचे आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचावे, विशेषतः महिलांबाबत केंद्र शासनाने राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती जनतेला व्हावी म्हणून या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे यांनी सांगितले.
या रॅलीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा पदाधिकारी यांच्यावतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ सुमंत ए खाडे स्वतः बाईकवरुन सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या समवेत भाजप महिला मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्षा सौ. शोभा तोडकर, शहर अध्यक्षा अनघा कुलकर्णी, अनिता हारगे, शोभाताई गाडगीळ, रूपाली गाडवे यांच्यासह बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.