Sangli Samachar

The Janshakti News

अमित शाहांचा राज ठाकरेंना पहिल्याच भेटीत सावध इशारा



सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
नवी दिल्ली -  राज ठाकरेंनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असं अमित शाह म्हणाले.

विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप, तेव्हाच ठरवू असं शाह म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे, याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू, अशी स्पष्ट भूमिका अमित शाहांनी मांडली असल्याची माहिती समोर येत आहे.


वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी मुंबईतील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई देण्यात यावा असा प्रस्ताव ठेवला होता. यावर अमित शाह यांनी एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचे सांगितले राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असं अमित शाह म्हणाले.