yuva MAharashtra ऐन लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान "या" चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा

ऐन लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान "या" चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या चरित्रपट, प्रिक्वेल आणि सिक्वेल चित्रपटांची लाट आली आहे. अनेक सुपरहिट हिंदी जुन्या चित्रपटांची आजही प्रेक्षकांवर भूरळ आहे. त्या चित्रपटांना नवी झळाळी येईल असे वाटलेही नव्हते अशा गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल आता येण्याच्या मार्गावर आहेत. वयाच्या पाशष्टीतही चिरतरुण असणारे अभिनेते अनिल कपूर यांच्या एका गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल येणार असे सांगितले जात आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पठाण चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद घेणार असल्याचे देखील समोर येत आहे.

दिग्दर्शक एस. शंकर यांचा 'नायक' चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूर यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती. शिवाजी राव हे त्यांच्या पात्राचे नाव होते. तर शिवाजी मुख्यमंत्र्यांना खडतर प्रश्न विचारतो आणि त्या बदल्यात त्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते, असे चित्रपटाचे कथानक आहे. आता तब्बल २३ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल येणार अशा चर्चा रंगल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, 'पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद 'नायक २' लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. सिद्धार्थ आणि ममता आनंद त्यांच्या Marflix Pictures च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मिलन लुथरिया या चित्रपटाची निर्मिती करणार असे सांगितले जात असून लेखन रजत अरोरा करणार आहेत.

'नायक' चित्रपटात अनिल कपूर, राणी मुखर्जी आणि अमरीश पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. परंतु, नायकच्या सिक्वेलमध्ये सिद्धार्थ आनंद नवीन कलाकार घेणार असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे नायकच्या सिक्वेलमध्ये व्यस्त असणारे सिद्धार्थ आनंद जयदीप अहलावत आणि सैफ अली खानसह 'ज्वेल थीफ' चित्रपट करणार असून शाहरुख आणि सुहानाच्या 'किंग' चित्रपटाची निर्मिती देखील करणार आहेत.