yuva MAharashtra "अब की बार भाजप तडीपार" उद्धव ठाकरे यांचा जाहीरसभेत नारा

"अब की बार भाजप तडीपार" उद्धव ठाकरे यांचा जाहीरसभेत नारा



सांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
मुंबई - भाजपाने केवळ शहराची आणि स्थानकांची नावे बदलल्या पलिकडे काही केले नाही. त्यावेळी भाजपाने अच्छे दिन आएगे असा नारा होता. पण अच्छे दिन काही आले नाहीत. तो एक जुमला होता. आता भाजपा गॅरंटी देत आहे. हा एक जुमलाच आहे. आमच्या खासदारामुळे गेल्यावेळी तुम्ही अडीचशेच्या पार गेला होता हे लक्षात ठेवा. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा होता. आता दिल्लीचेही तख्त फोडावे लागेल, आता अब की तडीपार अशी घोषणा द्यावी लागेल. कसे चारशे पार जाता हे पाहातो अशी डरकाळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी धारवी येथील सभेत फोडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोषणा अब की बार.. त्यापाठोपाठ कार्यकर्त्यांनी तडीपार असा प्रतिसाद दिला.


उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले की आठवर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचं पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केलं होते. जाहीर सभेतून, त्यापैकी किती आले. आले असतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत येतो असेही ते म्हणाले. आता मोदींचा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो. पदरात काय पडलं. धोंडे पडले तरी त्यात त्यांना शेंदूर फासून देव करता येतो. हे काय करणार. यांनी फक्त नावं बदललं. योजनांची नावे बदलली. काही काम केले नाही. आता जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवली आहे. भ्रष्टाचार करा. भाजपमध्ये या तुमचे वाकडे होणार नाही. ही मोदी गॅरंटी असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

गडकरी यांचे नाव वगळले…

भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नाव भाजपच्या यादीत. मोदी शाह हे नाव आम्हाला माहीत नव्हते. आम्हाला प्रमोद महाजन यांनी ओळख करून दिली. महाजन यांच्यासोबत नितीन गडकरी आले. गडकरी यांनी ५५ उड्डाणपुलं बांधली. संघाचा निष्ठावंत माणूस आहे. पण त्यांचं नाव या पहिल्या यादीत नाही. मुंबईतील कृपाशंकर सिंह यांचं नाव यादीत आहे. पण गडकरींचं नाव नाही अशी टीका त्यांनी केली. दिल्लीचे तख्त फोडतो महाराष्ट्र माझा. पहिल्यांदा आपल्याला दिल्लीचे तख्त फोडावे लागेल. ‘अब की बार भाजप तडीपार’ ही घोषणा द्यावी लागेल. आता कसले ४०० पार जातो ते बघतोच. गेल्यावेळी महाराष्ट्राने निवडून दिले नसते, तर तुम्ही अडीचशेच्या पार गेला नसता अशी जोरदार टीका ठाकरे यांनी यावेळी केली.