yuva MAharashtra गट-तट, हेवेदावे विसरून काँग्रेस लागली कामाला; पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका

गट-तट, हेवेदावे विसरून काँग्रेस लागली कामाला; पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका



सांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
मुंबई - एकीकडे संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते काँग्रेसला रामराम ठोकून भाजप किंवा शिवसेना अथवा राष्ट्रवादी दाखल झाले. अशा परिस्थितीतही संकटात सापडलेल्या काँग्रेसच्या बुडत्या जहाजाला वाचवण्यासाठी उर्वरित नेते व कार्यकर्त्यांनी कंबर कसल्याचे समाधानकारक चित्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे गट-तट विसरून कामाला लागण्याचे धोरण अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निश्चित केले आहे. या दृष्टिकोनातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुढील आठवडाभर शहरभर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत.



आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. जुने-जाणते कार्यकर्ते एकत्रित येऊन काँग्रेस संघटना मजबूत करण्याकडे लक्ष देताना पाहायला मिळत आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये काँग्रेसची झालेली पीछेहाट यंदा तरी थांबेल, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेतृत्वाकडून केली जात आहे.

"आपकी बार चारसो पार" चा झंझावात महाराष्ट्र बाहेर थोपवण्याचा भीमनिर्धार नेते व कार्यकर्त्यांनी केला आहे. जे नेते काँग्रेस वरून इतर पक्षामार्फत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, त्यांची एक तर घर वापसी होईल, किंवा त्यांना घरी बसवण्यात येईल, असा निर्धार करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते, जिल्ह्या जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात बळ देण्याच्या तयारीत असून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच आघाडीवर राहिली पाहिजे या जिद्दीने कामाला लागलेले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारी यादीवर अध्यक्ष शिक्का मुहूर्त झालेले नसले तरी निवडून येणारे खात्रीशीर उमेदवारच यावेळी निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसात महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होऊन, त्यांचा प्रचार सुरू होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.