सांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
कामेरी - प्रत्येक काम आनंदानं करा. रोजच्या रोज आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आपण बचत गटाच्या माध्यमातून आधीपेक्षा सक्षम झालो आहोतच. आता गरज आहे ती मानसिक सक्षमीकरणाची. मानसिक आरोग्य सुधारण्याची. त्यासाठी आपल्या भावना ओळखणं महत्वाचं. रागासारख्या तीव्र भावनेवर नियंत्रण ठेवा. एखाद्या दु:खद घटनेतून लवकरात लवकर बाहेर पडा. असं मत समुपदेशक अर्चना मुळे यानी व्यक्त केले.
टीडब्ल्यूजे असोसिएट्स सांगली या संस्थचे चंद्रकांत पाटील, चेतन खोत, अजिंक्य मिरजकर यांच्या पुढाकाराने कामेरी येथे जागतिक महिला दिन निमित्त जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.महिलांचं मानसिक आरोग्य तसेच शासकिय ग्रामोद्योग योजना आणि आर्थिक सहाय्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.गावातील सर्व बचत गट आणि इतर सर्व महिला ग्रामस्थानी याचा लाभ घेतला.
टीडब्ल्यूजे सोशल रिफाॅर्म्स संस्थेच्या ग्रामविकास, असिस्टंट मॅनेजर वैशाली कदम म्हणाल्या,"बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही जो काही व्यवसाय करत आहात. या व्यवसायासाठी लागणारं पॅकेजिंग असेल किंवा बाजारपेठ उपलब्ध करून देणं असेल आमची संस्था यासाठी सहकार्य करेल. याचा लाभ घ्या. असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जयश्री चंद्रकांत पाटील, स्वप्ना रणजित पाटील, मा.जि.प. सदस्या सुरेखा मोहन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचं स्वागत - प्रास्ताविक साक्षी पाटील, आकांक्षा जाधव यांनी केलं. गायत्री अंबर्गी, कोमल यलमार यांनी सूत्र संचलन केलं. मोहिनी मोरे, स्नेहल पाटील यांचं सहकार्य लाभलं. जयश्री पाटील आणि साक्षी पाटील यांनी शेवटी आभार मानले.