yuva MAharashtra रेशन दुकानावर दिलेल्या साडी, पिशव्यांची केली होळी

रेशन दुकानावर दिलेल्या साडी, पिशव्यांची केली होळी



सांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
परभणी : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना रेशन दुकानावर साडी व मोफत धान्य देण्यात येत आहे. मात्र या साड्या जुन्या वापरलेल्या असल्याचा आरोप करत नागरिकांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कान्सुर येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर साडी व पिशवीची होळी करण्यात आली.

शासनाच्यावतीने रेशन दुकानामार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्यांमधून मोदी सरकारची हमी म्हणत साडी आणि मोफत धान्य देण्यात येत आहे. दरम्यान रविवारी पाथरी तालुक्यातील कान्सुर येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर या पिशव्यांमध्ये जुन्या वापरलेल्या साड्या दिल्या जात असून या पिशव्यांवर भारत सरकारचा लोगो लहान असून मोदीजींचा मोठा फोटो देण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ होणारी असून, राज्यात सर्वच ठिकाणी रेशन कार्ड वरील मिळणाऱ्या साड्या खरंच जुन्या आहेत, की फक्त परभणी येथील सदर रेशन दुकानातच अशा जुन्या साड्या देण्यात येत होत्या, याबाबत चौकशी करण्याची माहिती मागणी पुढे येत आहे.