yuva MAharashtra साडेतीन कोटी मतदारांचा सरकार निवडण्यात मोठी भूमिका ?

साडेतीन कोटी मतदारांचा सरकार निवडण्यात मोठी भूमिका ?



सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
मुंबई - महाराष्ट्रात उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक ४८ लाेकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे केंद्रात सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रातील मतदारांची भूमिका फार महत्त्वाची आहे. राज्यातील ४० टक्के मतदार हे ३० ते ४९ या वयाेगटातील आहेत. या गटाचे मतदान निर्णायक ठरु शकते. या वयाेगटातील लाेक आपले नवीन सरकार निवडण्यात माेलाचा वाटा उचलू शकता.

महाराष्ट्रात ५ टप्प्यात लाेकसभेचे मतदान हाेणार आहे. उमेदवाराच्या निवडीसाठी हे तरुण मतदान निर्णायक ठरणार आहेत. कारण, ४० टक्के मतदार मतदारसंघातील विजयाचे गणित बदलू शकतात. या निमित्ताने हे तरुण आपला लोकप्रतिनिधी निवडण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत.


वयाेगट मतदार प्रमाण

३०-३९ वर्षे २.०७ काेटी २२.५९%
४०-४९ वर्षे २.०२ काेटी २१.५८%
५०-५९ वर्षे १.५३ काेटी १६.३४%
६०-६९ वर्षे ०.९८ काेटी १०.६६%
७०-७९ वर्षे ०.५३ काेटी ५.८%
८०-८९ वर्षे ०.२० काेटी २.२८%
८० पेक्षा जास्त ५.३१ लाख ०.५८%
८५ पेक्षा जास्त १३.१३ लाख -
१०० पेक्षा जास्त ५२ हजार -

१,८४,८४१ नव्या मतदारांची नाेंदणी १७ ते २२ मार्च या कालावधीत झाली आहे

७० पेक्षा जास्त वयाच्या महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

लोकसभा निवडणूक - सविस्तर कव्हरेज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा