yuva MAharashtra नूतन अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी पाणीपुरवठा व जलनिसःरण यंत्रणेची केली पाहणी...

नूतन अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी पाणीपुरवठा व जलनिसःरण यंत्रणेची केली पाहणी...



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
सांगली  - सांगली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगली जॅकवेल येथे भेट दिली तेथील कामाची पाहणी केली , सबस्टेशनचे काम सुरू आहे ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या बाबत ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत 70 एम एल डी माळ बंगला येथे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली देखील करून पाणीपुरवठा यंत्रणे कामकाज बाबत समाधान व्यक्त केले, त्याचप्रमाणे जलनिसरण विभागाकडील हनुमान नगर 23 एम एल डी क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राची ,सांगली ड्रेनेजचे गॅपचे काम पूर्ण करण्या बाबत पाहणी करून तेथील अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत ठेकेदारांना सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  तसेच अंकली पंप स्टेशन येथेही भेट देऊन पंपिंग मशनरी, इरेक्शनची यावेळी पहाणी देखील केली आहे. नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, त्या साठी पाणी पुरवठा आणि जलनिसरण यंत्रणा नेहमी सज्ज असली पाहिजे, अपुरी कामे अभियंता यांनी समक्ष लक्ष केंद्रित करून वेळेत पूर्ण करून घेतली पाहिजे , मनपाच्या आर्थिक बाबीवर परिणाम करणाऱ्या कामा बाबत सदैव जागृत राहून काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयन्त केला पाहिजे या कडे लक्ष दिले पाहिजे , या बाबत या विभागाकडील अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.