सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४
सांगली : प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेंतर्गत या दिवाळीपूर्वी महापालिका क्षेत्रात ५० ई- चर्चा बसेस धावतील. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना किफायतशीर दरात प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी महापालिकेच्या बजेट मंजुरीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेचे २०२३-२४ चे सुधारित व २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रक नुकतेच प्रशासकीय महासभेत मंजूर झाले. आयुक्त सुनील पवार म्हणाले, केंद्राकडून ५० ई-बसेस मिळणार आहेत. १२ मीटर लांबीच्या २० बसेस आणि ९ मीटर लांबीच्या ३० मिडी डी बसेस मिळणार आहेत. या सर्व बसेस नॉन एसी असतील. मिरज येथे १० कोटी रुपये खर्चुन ई-बस डेपो उभारला जाणार आहे. याठिकाणी बस चार्जिंग सेंटरही असणार आहे. रिक्षा चालकांना विश्वासात घेऊन ई- बसेसचे मार्ग ठरवण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.