yuva MAharashtra सांगली कोल्हापूरच्या महापुराचा त्रास कायमचा बंद करू - मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !

सांगली कोल्हापूरच्या महापुराचा त्रास कायमचा बंद करू - मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !



सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४

हातकणंगले - कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराचा त्रास कायमचा बंद करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत कोरची (ता. हातकणंगले) येथे बोलताना दिली.
सांगली कोल्हापूरचा पूर कायमचा बंद झाला पाहिजे याकरिता जागतिक बँकेच्या मदतीने ३,२०० कोटीचा प्रकल्प दाखविला जात असल्याचे सांगत शिंदे म्हणाले ते या प्रकल्पातून सांगली, कोल्हापूरच्या महापुराचा त्रास कायमस्वरूपी दूर केला जाईल. पंचगंगा तसेच कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी डीआरपी तयार केला जाईल. प्रदूषण रोखण्यासाठी जिथे जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी एसटीपी उभारले जाणार आहेत. कृष्णा, पंचगंगा नदी प्रदूषणासाठी केंद्र सरकार हेही मदत करेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे अभियान राज्यातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवेल. महिला सुरक्षा अभियानही सुरू केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
इचलकरंजीच्या यंत्रमागांना वीज सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्नही लवकरच निकाल काढून असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून केली जाणारी 200 पट पाणीपट्टी वसुलीला स्थगिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, महिला बचत गटांचे खेळते भांडवल 15 हजारवरून दुप्पट म्हणजे, ३० हजार केले आहे. सीआरपी चे मानधन दुप्पट केले आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे माध्यमही वाढवले आहेत. त्यांच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील. त्यांना मोबाईल ही देण्यात येणार आहेत. अशा स्वयंसेविकांना सरकार नाराज करणार नाही. दहा शहरातील 5000 महिलांना पिंक रिक्षा देण्याचा निर्णयही घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महिला व बालविकास विभागाला तीन हजार कोटींची तरतूद केली असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या मेळाव्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हजारो महिला उपस्थित होत्या. त्यांना लिहिल्या आणण्यासाठी व जेवणासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. मिळाल्यानंतर बोलताना महिलांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांबाबत समाधान व्यक्त केले.