yuva MAharashtra मुंबईतील किंग्स सर्कल रेल्वे स्टेशनचं नाव आता तीर्थकर पार्श्वनाथ

मुंबईतील किंग्स सर्कल रेल्वे स्टेशनचं नाव आता तीर्थकर पार्श्वनाथ



सांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
मुंबई - मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं आता बदलण्यात येणार आहेत. शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. उद्या होणाऱ्या राज्य मंत्री मंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे. यासंदर्भात राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा अधिकार राज्याला आहे. ही नावं लवकरात लवकर बदलण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचंही राहुल शेवाळे म्हणाले.


या रेल्वे स्टेशन्सची नावं बदलणार

मुंबई सेंट्रल चे नाव नाना जगनाथ शंकर शेठ

करीरोडचं नाव लालबाग

सँडहर्स्टचं नाव डोंगरी

मरीनलाईन्सचं नाव मुंबादेवी

डॉकयार्ड रोडचं नाव माझगाव स्टेशन

चर्नीरोडचं नाव गिरगाव

कॉटनग्रीनचं नाव काळाचौकी

किंग्स सर्कलचं नाव तीर्थकर पार्श्वनाथ