सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषगाने सांगली जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखणे कामी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीकरिता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सी.आय.एस.एफ.) जवान बंदोबस्त कामी तैनात आहेत.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सी.आय.एस.एफ.) जवान हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे कुटूबांपासून दुरवर बंदोबस्त कामी तैनात असल्याने त्यांना धुलीवंदन सण कुटुंबांसोबत साजरा करता येत नसल्याने, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी जिल्हा पोलीस दलाचे कुटूंब प्रमुख या नात्याने त्यांच्यासोबत पोलीस मुख्यालय, विश्रामबाग, सांगली येथे धुलीवंदन साजरी केला.
सदर कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक अति. कार्यभार पोलीस उप अधीक्षक (गृह) अरविंद बोडके, राखीव पोलीस निरीक्षक सुर्यवंशी व जिल्हा पोलीस दलाकडील अधिकारी व अंमलदार यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सी.आय.एस.एफ.) अधिकारी व कर्मचारी यांना धुलीवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.