Sangli Samachar

The Janshakti News

रेठरे धरण येथील युवकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
सांगली - जबड्यात कुत्र्याची शिकार व नजरेत हल्ला करण्याच्या तयारी या आवेशात असलेल्या बिबट्याचा थरार येथील विजय बाजीराव पाटील या युवकाने अनुभवला. घटनास्थळी डंपर आल्याने बिबट्याच्या तावडीतून त्याची सही सलामत सुटका झाली. 'काळ आला होता, पण वेळ आली' नव्हती, अशी थरारक घटना रेठरे धरण येथे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. परंतु, दोन दिवसानंतर हा प्रकार उजेडात आला.

रेठरे धरण तलावाच्या पूर्वेस माळरानावर शेतातील कामासाठी मशीन सुरू होती. त्यामुळे विजय पाटील हा युवक एकटाच तिथे झोपला होता. पहाटे तीन वाजता पावलांचा आवाज आल्याने त्याच्या दिशेने विजय याने बॅटरी दाखविली. यावेळी बिबट्याच्या तोंडात कुत्र्याची शिकार दिसली. पण बिबट्या युवकाच्या दिशेने येऊ लागला.

त्यावेळी त्याने आरडाओरडा केला, परंतु जवळ कोणीच नव्हते, विजय देखील पुढे बिबट्याकडे पाहत पाठीमागे चालत असताना त्याच्या पायाला दगड लागून पाय रक्तबंबाळ झालेला त्याचवेळी जबड्यातील कुत्र्याला खाली टाकून देत, बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा तास हा थरार सुरू होता.

डंपर आल्याने वाचला जीव..

त्यावेळी तेथे एक डंपर आला व त्याच्या उजेडात चालकाला बिबट्या व समोर युवक असल्याचे दिसल्यावर त्याने घाबरलेल्या विजयला डंपरच्या केबिनमध्ये घेतल्याने त्याची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली.