सांगली समाचार - दि. १५ मार्च २०२४
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. दरम्यान, विविध संस्था सर्व्हेच्या माध्यमातून देशातील जनमताच्या कौलाचा अंदाज घेत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात उमेदवार कुणीही असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपाला मतदान करणार का? असा प्रश्न विचारला असता मतदारांनी धक्कादायक उत्तर दिल्याचे समोर आले आहे.
न्यूज १८ नेटवर्कने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात उमेदवार कुणीही असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपाला मतदान करणार का? असा प्रश्न विचारला असता तब्बल ८५ टक्के मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे उमेदवार कुणीही असला तरी भाजपाला मत देणार असं सांगितलं आहे. तर ११ टक्के मतदारांनी मोदींकडे पाहून नाही तर उमेदवार पाहून मतदान करणार, असं सांगितलं. तर ४ टक्के मतदारांनी या प्रश्नावर काही सांगू शकत नाही असं सांगितलं.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीबाबत या सर्व्हेमधून विचारले असता ८० टक्के मतदारांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर खूप समाधानी असल्याचे सांगितले. तर १० टक्के लोकांना समाधानी वा असमाधानी नसल्याचे सांगितले. ५ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचे सांगितले. तर ४ टक्के लोकांनी खूपच असमाधानी असल्याचे सांगितले. एक टक्का लोकांनी काही सांगू शकत नाही असे सांगितले.