सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
सांगली - 'लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा', या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी स्वीकारले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री महेश चव्हाण, शुभम खोत, रोहित पाटील, कृष्णा यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई उपस्थित होते.
सध्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आचारसंहितेचा भंग होणारे पोस्टर्स बोर्ड आणि ध्वज काढण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणजे शहरातील अनेक ठिकाणचे भगवे ध्वज काढले जात असून क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे बोर्ड हे झाकण्यात येत आहेत याचा कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होत असल्याची तक्रार हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.