Sangli Samachar

The Janshakti News

सामाजिक सलोखा राखून निर्भयपणे मतदान करा - उपविभागीय अधिकारी जाधव

सांगली समाचार  - दि. १ मार्च २०२४$

सांगली - सामाजिक सलोखा राखा, निर्भयपणे मतदान करा, सोशल मीडियावर सायबर सेलचे सतर्क देखरेख व लक्ष असून! कोणत्याही धार्मिक भावना दुखावणार नाही. याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच कायदा राबवताना कोणताही भेदभाव न मानता- निरपेक्ष पणे पालन करण्यात येईल. बीट मार्शल, निर्भया पथक, कांबिंग ऑपरेशन सक्रिय आहेत. धार्मिक भावना दुखावणार नाही असे पोस्टर लावू नये. कोणत्याही ठिकाणी बेकायदेशीर व्यसन करणाऱ्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल. असे मनोगत विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले. लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्या व्यापक बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून जाधव बोलत होते. 

प्रास्ताविक पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांनी केले. त्यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात सूचना व मार्गदर्शन केले. बैठकीत उपस्थितांच्या सूचना व शंकांचे निरसन करण्यात आले. बैठकीस सागर घोडके, डॉ. संजय पाटील, ज्योती आदाटे, उत्तम कांबळे, रोहित शिंदे, युवराज गायकवाड, दादासो कोळेकर , तोहीद फकीर, सुभाष तोडकर, विश्वास लोंढे, जयंत जाधव, अभिजीत भोसले, रामभाऊ पाटील, अनिता पांगम ,मनीषा पाटील, प्रियंका तुप लोंढे, शंभूराज काटकर, तोहिद शेख, युवराज नाईकवडे, वंदना चंदनशिवे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.