सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
मुंबई - प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दुपारी त्या भाजप कार्यालयात आल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपची वाट धरली आहे. अनुराधा पौडवाल यांचा भाजपप्रवेश झाला असून पौडवाल भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवतील का ? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. पौडवाल या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांची गाणे आजही लोकांचा पसंतीस पडतात. त्यांची काही भक्तीगीते खूप लोकप्रिय आहेत.
लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, 'अद्याप मला काही माहिती नाही. पक्ष जसं सांगेल तसं मी करणार आहे.' भाजपमध्ये येणे मी भाग्य समजते, असंही त्या म्हणाल्या.
लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत. त्याआधी भाजपमध्ये इनकमिंग वाढली आहे. अनुराधा पौडवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व भाजपसोबत आलं आहे. पण, भाजप त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का? किंवा पुढे त्यांना संधी देण्यार हे पाहावं लागणार आहे. तुर्तास यावर सस्पेंस कायम आहे.