yuva MAharashtra घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई



सांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
सांगली - सांगली, सातारा जिल्ह्यात घरपोडी करून सोन्या चांदीचे दागिने सोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 36000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याच्याकडून सांगली सातारा जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती सांगली शहर चे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.


आकाश प्रकाश चव्हाण (वय 24, राहणार जुना बुधगाव रस्ता, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरात घरफोडी करणाऱ्यांना अटक करण्याच्या सूचना निरीक्षक मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील संतोष गळवे यांना सराईत गुन्हेगार सांगलीतील वाल्मिकी आवास योजना परिसरात चोरीचा ऐवज विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या एका तरुणास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर, त्याच्या खिशात सोन्याचे दागिने सापडले. याबाबत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सांगली तसेच साताऱ्यातील बोरगाव येथे घरपोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली. दागिने जप्त करून त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सांगलीतील दोन तर साताऱ्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.