सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
सांगली - सध्या उन्हाळाची तीव्रता वाढत असल्याने अन्न व पाणी नसल्यामुळे चिमणीसह अनेक पक्षी अन्न, पाण्यासाठी भटकंती करत असतात. त्यांच्यासाठी आपल्या घरावर दररोज मूठभर धान्य व भांड्यात पाणी ठेवण्याची आवश्यकता आहे.
राज्यात सध्या उष्णता मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. अनेक ठिकाणी पाझर तलावासह पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे आपल्या घराच्या छतावर, वरच्या मजल्यावर किंवा ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी मूठभर धान्य व पिण्याच्या पाण्यासाठी भांड्यात पाणी ठेवावे, असे नियोजन प्रत्येक घरांवर करावे.