yuva MAharashtra महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागासाठी शिंदेंचं मोठं पाऊल; बेळगावसाठी हा निर्णय

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागासाठी शिंदेंचं मोठं पाऊल; बेळगावसाठी हा निर्णय



सांगली समाचार  - दि. १७  मार्च २०२४
मुंबई  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चिघळला होता. मात्र, आता महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्र्यांनी आता थेट बेळगाव आणि बिदरसारख्या डिस्प्युटेड भागांसाठी विशेष निधींची तरतूद केली आहे. लोकसभा निवडणूका जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारकडून विविध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ट्रस्ट यांना दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर करताना बिदर-बेळगावमधील संस्थांनाही निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

सरकारकडून दोन कोटींचा निधी मंजूर - 
25 लाख रुपये - महाराष्ट्र सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी, निपाणी, बेळगावला 25 लाख रूपये मंजूर. तर 25 लाख रुपये रघुनाथ महाराज शिक्षण संस्था, बिदर या शाळेच्या बांधकामासाठी मंजूर केले आहेत.
25 लाख रुपये - सत्यम शिवम सुंदरम रुरल डेव्हलपमेंट असोसिएशन, बिदर, बेळगाव, हॉस्पिटल संबंधी साहित्य खरेदीसाठी मंजूर
ग्रंथालये, शाळांचे वर्ग, हॉल, मेडिकल व्हॅन अशा विविध उपक्रमांसाठी सेवाभावी संस्थांना राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
9 लाख रुपये - मेडिकल व्हॅन खरेदीसाठी जय बजरंग बहुउद्देशीय आदिवासी सेवाभावी संस्था, हिंगोली यांना देण्यात येणार
25 लाख रुपये - सुसज्ज ग्रंथालय उभारणी, तांबळेश्वर शिक्षण संस्था, गडहिंग्लज, कोल्हापूरसाठी देणार.


25 लाख रुपये - महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह बांधकाम, दर्यापूर, अमरावती
30 लाख रुपये - अभिनव युवा बहुउद्देशीय संस्था, अमळनेर, जळगाव, शाळेचे बांधकाम करण्यासाठी
10 लाख रुपये - आदिराज प्रतिष्ठान, कर्जत, अहमदनगर, मेडिकल व्हॅन खरेदी
25 लाख रुपये - देवगिरी प्रतिष्ठान, बीड
10 लाख रुपये - नागनाथ महिला सेवाभावी संस्था, बीड, मेडिकल व्हॅन खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल सीमाभागात समाधान व्यक्त होत आहे.